जालना : एनर्जी ड्रिंक (Jalna)चोरणाऱ्या दोन चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने (Beed)बीड येथून अटक केली आहे. त्यांच्याकडून नऊ लाख ८९ हजार ४०० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मंठा तालुक्यातील तळणी फाटा येथील (crime news)दुकानाचे शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी एनर्जी ड्रिंकचे बाॅक्स लंपास केले होते. याप्रकरणी मंठा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करताना संशयित आरोपी हे (Beed)बीड येथील असल्याची माहिती मिळाली.त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने बीड येथून शेख सोहेल शेख कमरोहीन (वय २५, राहणार ख्वाजा नगर, मोमीनपुर पेठ, बीड), अमीन शमीम शेख (वय ३०, रा. अहमद मस्जीद, मोमीनपुर पेठ, बीड) या दोघांना अटक केली.त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या कार, तसेच चोरी केलेले एनर्जी ड्रिंकचे बाॅक्स असा एकूण नऊ लाख ८९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान न्यायालयाने या दोन्ही संशयित आरोपींना तीन दिवसांची(Jalna police) पोलिस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव, मंठाचे पोलिस निरीक्षक रवींद्र निकाळजे, सहायक पोलिस निरीक्षक योगेश उबाळे, क राजेंद्र वाघ, रामप्रसाद पन्व्हरे, गोपाल गोशीक, कैलास खार्डे, सागर बाविस्कर आदींनी केली.