Advertisement

वाळू वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई 

प्रजापत्र | Thursday, 13/03/2025
बातमी शेअर करा

 बीड दि.१३ (प्रतिनिधी):तालुक्यातील कुर्ला येथे विनापरवाना ट्रॅक्टरच्या(Beed) साहाय्याने अवैध वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलिसांनी (दि.१२) बुधवार रोजी(Beed police) सायंकाळी कारवाई करत ६,०४,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला . 

बीड (Beed)जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून अवैध वाळू वाहतुक करणाऱ्यावर पोलिसांकडून कारवाईचा धडाका सुरू आहे.कारवाई सुरु असताना देखील अवैध वाळू वाहतूक केल्याच्या घटना समोर येत आहेत. बीड (Beed crime)तालुक्यातील कुर्ला येथे ट्रॅक्टरच्या साहाय्याने अवैध वाळू वाहतूक करताना शेख सुभान शेख मुसा (वय ३५) रा. कुर्ला.ता.जि. बीड याच्यावर बीड ग्रामीण पोलिसांनी(Beed police) (दि.१२) बुधवार रोजी सायंकाळी कारवाई केली. यात निळ्या रंगाचा सोनालीक ट्रॅक्टर डीआय ७५० व विनानंबरची दोन चाकी लोखंडी ट्रॉली किंमत ६,००,००० तसेच १ ब्रास वाळू किंमत ४,००० असा एकूण ६,०४,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अधिक तपास बीड(Beed gramin police) ग्रामीण पोलीस करत आहेत.   

Advertisement

Advertisement