Advertisement

वॉकिंग करतांना पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यु 

प्रजापत्र | Tuesday, 11/03/2025
बातमी शेअर करा

 बीड दि.११(प्रतिनिधी):- बीड जिल्हा पोलिस (Beed police)दलात वाहन चालक म्हणून कार्यरत असलेले राजू बखरे हे आज (दि.११) रोजी सकाळी पत्नीसोबत पोलिस मुख्यालय येथे वॉकिंग करत होते. त्याचवेळी त्यांना हदयविकाराचा धक्का आल्याने त्यांना तात्काळ खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. (Beed)वखरे हे पोलिस मुख्यालयात नेमणूकीस होते. अत्यंत मनमिळावू स्वभावाचे म्हणून ते परिचित होते. त्यांच्या अचानक निधनाने कुटुंबियांसह नातेवाईक व मित्रपरिवारालाही धक्का बसला असून या घटनेने पोलिस(Beed police) दलात हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisement

Advertisement