बीड दि.८(प्रतिनिधी)- (beed)बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी चौथ्या मजल्यावरून खाली पडल्याने गंभीररित्या जखमी झालेल्या बांधकाम मजुराचा मृत्यु झाल्याची दुर्देवी घटना आज सकाळी शहरातील इस्लामपुरा इदगाह परिसरात घडली.
बीड शहरातील मोहम्मदीया कॉलनी येथील उमर शाहेद शेख (वय २०) हा बांधकाम मजुर आज (दि.८) रोजी सकाळी(Beed) काम करत असतांना चौथ्या मजल्यावरून खाली पडला. गंभीररित्या जखमी झाल्याने त्याला तात्काळ जिल्हा (beed civil hospital)रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यु झाला. उमर शेख याला रोजा (उपवास) होता. रोजामध्ये असतांना त्याचा मृत्यु झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
बातमी शेअर करा