पाटोदा दि.६(प्रतिनिधी):तालुक्यातील धस पिपंळगाव येथे अज्ञात चोरटयांनी दुचाकी आडवी लावत स्कुटीच्या डिक्कीतील सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा ४,५१,००० रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना (दि.१) शनिवार रोजी घडली असून पाटोदा पोलीस ठाण्यात(beed police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पाटोदा (Patoda)शहरातील कलर दुकानाचे व्यावसायिक अशोक वसंत नेमाने (वय ३९) रा.चुंबळी रोड पाटोदा (Crine news)हे नवगण राजुरी येथून निर्गुडी गारमाथामार्गे पाटोद्याकडे येत असताना धस पिपंळगाव गावाजवळ बीड-आहिल्यानगर रोडवर अज्ञात चोरटयांनी स्कुटी वरून ओढून गंभीर दुखापत करून त्यांच्या स्कुटीच्या डिक्कीमध्ये ठेवलेल्या बॅग मधील रोख रक्कम ५०,००० रुपये व ८० ग्रॅम २०० मिली वजनाचे सोन्याचे दागिने किंमत(beed crime) प्रति तोळा ५०,००० रु.प्रमाणे ४,०१,००० रुपये असा एकूण ४,५१,००० रुपयांचा ऐवज जखमी करून लुटल्याची घटना (दि.१) शनिवार रोजी घडली असून अशोक नेमाने यांच्या फिर्यादीवरून (दि.५) बुधवार रोजी पाटोदा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पाटोदा पोलीस करत आहेत.