Advertisement

व्यापाऱ्याला मारहाण करत लुटले !

प्रजापत्र | Wednesday, 05/03/2025
बातमी शेअर करा

बीड दि.५ (प्रतिनिधी): पेठ बीड(Beed) भागातील विप्रनगर येथील व्यापारी पांडुरंग सुगडे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ असणाऱ्या यशवंत उद्यानाच्या समोर तिघांनी मारहाण करत(Crime news) खिश्यातील ११ हजार रूपये काढून घेत जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी पांडुरंग सुगडे रा. वैष्णो देवी मंदीराजवळ विप्रनगर यांना आरोपी बळवंत टाक याने व त्याच्या दोन साथीदाराने यशवंत उद्यानासमोर मारहाण करत जबरदस्तीने खिश्यातील ११ हजार रूपये (Beed police)काढत जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात कलम ३०९ (६), ३५१ (२) बीएनएस २०२३ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पो.ह.राठोड हे करीत आहेत.

Advertisement

Advertisement