अंबाजोगाई दि.४ (प्रतिनिधी): चार वर्षांपूर्वीच्या खुनामधील फरार असलेल्या दोन आरोपी तसेच (Ambajogai) अंबाजोगाई,बीड व लातुर जिल्हामधील एकुण १९ मोटार सायकल चोरीच्या गुन्हयामध्ये फरार असलेला आरोपी परळी येथे असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून खुनाच्या दोन आरोपीसह (Crime news)दुचाकी चोराच्या मुसक्या (दि.४) मार्च रोजी सकाळी आवळल्या आहेत. सदरील तिन्ही आरोपींना अंबाजोगाई शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
(दि.३१) ऑगस्ट २०२१ रोजी दिलीप अभिमान धोत्रे रा.अंबाजोगाई यांनी पोलीस ठाणे (Ambajogai) अंबाजोगाई शहर येथे दिलेल्या तक्रारीत म्हटले होते, डुक्कर का मारले या कारणावरुन अंबाजोगाई येथील आरोपींनी फिर्यादीचा भाऊ रवी अभिमान धोत्रे यास खंजीर व चाकूने भोसकून ११ आरोपींनी त्याचा खून केला होता, यातील आरोपी फरार झाले होते. या गुन्हयातील आरोपी हे परळी येथील उड्डाणपुलाखाली दिसल्याचे गोपनिय माहीती स्थानिक (Lcb)गुन्हे शाखेच्या पथकास मिळताच परळी येथे सापळा रचून या खुनामधील दोन आरोपी तेजसिंग उर्फ तेजेश शेरसिंग गोके (वय ३५), पुनमसिंग तारासिंग टाक (वय ४०) दोन्ही रा. अंबाजोगाई तसेच त्याच्या सोबतच अंबाजोगाई, (Beed)बीड व लातुर जिल्हामधील १९ मोटार सायकल (Beed police)चोरीच्या गुन्हयामध्ये फरार असलेला आरोपी रोशनसिंग यशपालसिंग उर्फ रिशपालसिंग टाक (वय २०), रा.अंबाजोगाई याला पकडण्यात आले. सदरील तिन्ही आरोपी हे पुढील कारवाईसाठी अंबाजोगाई शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशांत,पोलीस हवालदार मारोती कांबळे, विकास राठोड, बाळकृष्ण जायभाये, विष्णू सानप, राजू पठाण, मनोज जोगदंड, पोलीस अंमलदार बप्पासाहेब घोडके, चालक नितीन वडमारे व गणेश मराडे यांनी केली आहे.

बातमी शेअर करा