Advertisement

पक्ष वाढीसाठी शिवसेनेचे संपर्क मंत्री जाहीर

प्रजापत्र | Tuesday, 04/03/2025
बातमी शेअर करा

मुंबई- राज्यात शिवसेनेचे संघटन वाढवून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मुसंडी मारण्यासाठी उपमुख्यमंत्री (Eknath Shinde) एकनाथ शिंदे यांनी आज पंचवीस जिल्ह्यांसाठी संपर्क मंत्री जाहीर केले. अकरा मंत्र्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली असून सर्वाधिक चार जिल्हे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे आहेत. तर भाजपचे प्राबल्य असलेल्या विदर्भातील तीन मोठ्या जिल्ह्याची जबाबदारी मंत्री संजय राठोड यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

तर मराठवाड्यात संभाजीनगर वगळता इतर जिल्ह्याची जबाबदारी भरत गोगावले, गुलाबराव पाटील, प्रकाश आबीटकर, संजय शिरसाट, (Sanjay Shirsat) योगेश कदम यांच्याकडे असणार आहे. राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर भाजपने सदस्य नोंदणीवर भर देत संघटनात्मक बांधणीवर जोर दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही राज्यभरात पक्ष वाढीची मोहिम हाती घेतली आहे. त्यानंतर शिवसेनेनेही संपर्क मंत्री नेमत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे.

मुंबईत विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन, सत्ताधारी पक्षाचे मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी यावरून वातावरण तापलेले आहे. या सगळ्या घडामोडी सुरू असताना एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या संपर्क मंत्र्यांची यादी जाहीर केली. यापुढील काळात नियुक्त संपर्क मंत्री हे त्यांना दिलेल्या जिल्ह्यांमध्ये पक्ष वाढीसाठी काम करणार आहेत.

 

हे आहेत संपर्क मंत्री

- गुलाबराव पाटील- परभणी, बुलडाणा

- उदय सामंत- मुंबई उपनगर, पुणे, सिंधुदुर्ग

- शंभुराजे देसाई- सांगली, आहिल्यानगर

- संजय राठोड- नागपूर, चंद्रपूर, अमरावती

- दादाजी भुसे- धुळे, नंदूरबार

- प्रताप सरनाईक- पालघर, सोलापूर

- भरतशेठ गोगावले- हिंगोली, वाशिम

- संजय शिरसाट- नांदेड, बीड

- प्रकाश आबीटकर- अकोला, लातूर

- आशिष जैस्वाल- भंडारा, गोंदिया

- योगेश कदम- जालना

Advertisement

Advertisement