Advertisement

बीड कडकडीत बंद 

प्रजापत्र | Tuesday, 04/03/2025
बातमी शेअर करा

बीड दि.४ (प्रतिनिधी): मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या (santosh deshmukh) प्रकरणातील फोटो समोर आल्यानंतर (दि.३) रोजी रात्री उशिरा बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. त्यां नंतर मंगळवार (दि.४) सकाळपासूनच बीड शहरातील मुख्य मार्केट असलेल्या सुभाष रोडवर दुकान उघडण्याची कुठेही लगबग दिसत नाही.पूर्णपणे मार्केट बंद होते. मध्यरात्री उशिरा बंदची हाक दिली असली तरी व्यापारी उस्फूर्तपणे या बंदमध्ये सहभागी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेत (valmik karad)वाल्मिक कराडच्या गँगने संतोष देशमुख यांना हाल हाल करून मारतानाचे फोटो, व्हिडीओ सीआयडीने दाखल केलेल्या दोषारोपपत्रातून समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दिवशीचे फोटो समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर आता (Beed)बीड जिल्ह्यातील नागरिक आक्रमक होताना दिसून येत आहेत. प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. एरवी सकाळपासून आपली आस्थापने खुली करण्यासाठी व्यापाऱ्यांची लगबग पाहायला मिळते. मात्र या बंदच्या अनुषंगाने बाजारपेठा बंद ठेवल्या गेल्या आहेत. देशमुख हत्या प्रकरणातील दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जावी. अशी मागणी यादरम्यान केली जातेय.

Advertisement

Advertisement