मुंबई दि. ४(प्रतिनिधी) :राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) अखेर आज मंत्री पदाचा राजिनामा (Resigne )देणार आहेत.संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर विरोधक आणि महायुतीमधील काहींनी धनंजय मुंडे यांच्या राजिनाम्यासाठी दबाव वाढविला आहे. . त्यातच संतोष देशमुख यांच्या हत्येचे मन हेलावणारे फोटो काल समोर आल्यानंतर तर सर्वत्र अधिकच खळबळ माजली आहे.
डिसेंबर २०२४ मध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली होती. यात सुरुवातीपासूनच वाल्मिक कराडचे (Walmik Karad) नाव समोर येऊ लागल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी समोर आली होती. विरोधी पक्षासोबतच सत्ताधारी पक्षातीलही तसेच राष्ट्रवादीमधिलही काहींनी धनंजय मुंडेंचा राजिनामा मागितला आहे.
आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस आणि सरकारकडून संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंवर कोणताही आरोप नाही त्यामुळे त्यांच्या राजिनाम्याची आवश्यकता नसल्याची भूमिका घेतली गेली होती. त्यानंतर या प्रकरणाच्या दोषारोप पत्रामध्ये वाल्मिक कराडला मुख्य आरोपी केले गेले, तसेच संतोष देशमुख हत्येचे मन हेलावणारे फोटो समोर आल्यानंतर राज्यभर संतापाची भावना उसळली होती. या पार्श्वभूमीवर काल रात्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक झाली त्यात धनंजय मुंडेंच्या राजिनाम्यावर पक्षाचे एकमत झाले असे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर मंगळवारी मंत्री धनंजय मुंडे मंत्रीपदाचा राजिनामा देणार आहेत.

प्रजापत्र | Tuesday, 04/03/2025
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा