बीड दि.३ (प्रतिनिधी): शहरातील(Beed) जालना रोड परिसरातील महावीर पेट्रोल पंपासमोरून अज्ञात चोरटयांनी (Crime)महिलेच्या गळ्यातील सोन्याचे १२ ग्रॅमचे गंठण लंपास केल्याची घटना (दि.१) शनिवार रोजी घडली असून शिवाजीनगर (shivajinagar police)पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी कि,शहरातील अयोध्या बाबासाहेब नेमाणे (वय ५२) रा. गायनगर (Beed police)बीड ह्या जालना रोड परिसरातील महावीर पेट्रोल पंपासमोरून (दि.१) शनिवार रोजी ६.३० च्या सुमारास जात असताना अज्ञात दोन चोरटयांनी दुचाकीवरून येत या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे १२ ग्रॅमचे गंठण लंपास केले.(दि.२) रविवार रोजी अयोध्या नेमाणे यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.पुढील तपास पोलीस करत आहेत.
बातमी शेअर करा