मुंबई : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज (दि.१) काँग्रेस विधिमंडळ पक्ष पदाधिका-यांची घोषणा केली . (Maharashtra Congress)या संदभातील माहिती महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफाॅर्म X अकाऊंटवरून दिली आहे.
"अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेजी यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्ष पदाधिका-यांच्या नियुक्त्या केल्या जाहीर केल्या. यामध्ये विधानसभा उपनेते म्हणून अमीन पटेल, विधानसभा मुख्य प्रतोद - (Amit Deshmukh)अमित देशमुख, विधानसभा सचिव, विधानसभा प्रतोद - शिरीषकुमार नाईक आणि संजय मेश्राण. तर विधानपरिषद गटनेतेपदी सतेज ऊर्फ बंटी पाटील (पुर्ननियुक्ती) , विधान परिषद मुख्य प्रतोद- अभिजीत वंजारी तर प्रतोदपदी राजेश राठोड या काँग्रेस नेत्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्र काँग्रेसच्या सर्व विधानसभा आणि विधान परिषद नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे आभार मानत भावी वाटचालीस शुभेच्छा देखील दिल्या आहेत.