Advertisement

संतोष देशमुख हत्या ( Deshmukh murder)प्रकरणातील दोषारोपत्र केज न्यायालयात वर्ग

प्रजापत्र | Saturday, 01/03/2025
बातमी शेअर करा

बीड दि. २८ (प्रतिनिधी ) : मस्साजोचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सीआयडीने( CID) गुरुवारी सुमारे दीड हजार पानांचे दोषारोपपत्र बीडच्या जिल्हा न्यायालयात दाखल केले होते. आता सदर दोषारोपांतर केजच्या न्यायालयाकडे वर्ग करण्यात आले आहे. केजमध्ये जिल्हा सत्र न्यायाधीश दुसरे सुधीर भाजीपाले(Kej Court) यांच्या न्यायालयात आता या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.
केज तालुक्यातील मस्साजोचे सरपंच संतोष देशमुख( Santosh Deshmukh murder) यांच्या हत्या प्रकरणाने सर्वत्र खळबळ माजलेली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण, आवादा कंपनीला खंडणी मागण्याचे प्रकरण आणि अट्रॉसिटीचे प्रकरण असे तीन एफआयआर केज पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या गुन्ह्यात मकोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा ) लावण्यात आलेला आहे.
गुरुवारी सीआयडीने या तिन्ही गुन्ह्यातील एकत्रित दोषारोपपत्र बीडच्या जिल्हा न्यायालयात दाखल केले. त्यावर शुक्रवारी बीडच्या जिल्हा न्यायालयाने सदर दोषारोपत्रे पुढील सुनावणीसाठी केजच्या सत्र न्यायालयाकडे वर्ग केली आहेत. केज न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश २ श्री. सुधीर भाजीपाले यांच्या न्यायालयात आता या प्रकरणांची सुनावणी(Trial)चालणार आहे. ते आता विशेष मकोका न्यायाधीश म्हणून या प्रकरणांची सुनावणी घेतील.

 

तिन्ही गुन्हे एकत्र झाल्याने वाढणार गुंता
संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या संदर्भाने केज पोलीस ठाण्यात तीन वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले होते. संतोष देशमुख यांच्या हत्येचा गुन्हा स्वतंत्र दाखल झाला होता. तर हत्येपूर्वीच्या काही घटनाक्रमांवरून खंडणीचा तसेच पवन ऊर्जा कंपनीच्या कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या प्रकरणात अट्रॉसिटीचा असे दोन गुन्हे पुन्हा वेगळे दाखल झाले होते. यातील काही आरोपी सर्व गुन्ह्यांमध्ये तर काही आरोपी एक किंवा दोन गुन्ह्यांमध्ये आहेत. ज्यावेळी तीन वेगवेगळे गुन्हे दाखल होतात त्यावेळी सहसा प्रचलित पद्धतीप्रमाणे तीन स्वतंत्र दोषारोपपत्र दाखल केले जातात. कारण प्रत्येक गुन्ह्यातील प्रत्येक आरोपीचा सहभाग वेगळा असतो. इथे मात्र तिन्ही गुन्ह्यांचे एकत्रित दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे. किमान बीड जिल्ह्यात तरी मागच्या पंचवीस वर्षातील हे पहिलेच  उदाहरण असावे. ज्या ठिकाणी एका गुन्ह्याचा दुसऱ्या गुन्ह्याशी संबंध जाणवतो, त्या दोषारोपांची सुनावणी एकत्रित घेण्याचा अधिकार न्यायालयाचा असतो. किंवा  सामान घटनास्थळ आणि वेळेचे गुन्हे एकाच न्यायालयासमोर चालावेत असे अपेक्षिले जात असते. मात्र त्याही प्रकरणात दोषारोपपत्र स्वतंत्र दाखल केले जातात. आता या प्रकरणात तिन्ही गुन्ह्यांचे एकत्रित दोषारोपपत्र दाखल झाल्याने सुनावणीच्या संदर्भाने तसेच दोषनिश्चितीच्या संदर्भाने देखील कायदेशीर  गुंता वाढू शकतो बोलले जात आहे. मात्र यासंदर्भाने दोषारोपांतरचा अभ्यास केल्यानंतरच काही भाष्य करता येईल
.
 

Advertisement

Advertisement