Advertisement

बीड पोलिसांना मिळेल फक्त पहिल्या नावाची नेमप्लेट!

प्रजापत्र | Thursday, 27/02/2025
बातमी शेअर करा

बीड दि.२७ (प्रतिनिधी):(Beed)जिल्ह्यातील जातीयवाद संपविण्याआधी पोलिसांच्या मनातून ‘जात’ काढण्यासाठी (Navneet kanwat) पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी पहिल्या नावाने बोलण्याचा आदेश काढला. त्यानंतर (Beed police)आणखी एक पाऊल पुढे टाकत कार्यालयीन व प्रत्येक (police thane)ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या टेबलवर आता पहिल्या नावाची पाटी लागणार आहे. त्यामुळे सामान्य लोकही पहिल्या नावाने बोलतील आणि कोणाचीही ‘जात’ समजणार नाही. यातून सलोखा वाढणार आहे.

लोकसभा निवडणुकीपासून जिल्ह्यात जातीयवाद वाढला आहे. विधानसभेत तो आणखी बळकट झाला. सध्या तर पोलिस दलातील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांवरही ‘जाती’चे आरोप होत आहेत. असे असतानाच (दि.९) डिसेंबर २०२४ रोजी (Massajog)मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (santosh deshmukh)यांची हत्या झाली आणि पोलिस अधीक्षक बदलले.(दि.२१) डिसेंबर २०२४ रोजी नवनीत काँवत (Navneet kanwat)यांची बीडला नियुक्ती झाली. त्यांनी आगोदर पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना पहिल्या नावाने बोलण्यासंदर्भात आदेश काढून आवाहन केले. याला यशही आले. (Beed police)त्यानंतर आता त्यांनी प्रत्येक पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्या टेबलवर केवळ पहिल्या नावाची (Crime news)नेमप्लेट देण्याचा निर्णय घेतला आहे. (दि.१) मार्च पासून याची अंमलबजावणी होणार आहे.

Advertisement

Advertisement