Advertisement

मुंबई बाजार समितीचे सभापतीपद जिल्ह्याबाहेर गेल्याचे माजलगावात स्वागत

प्रजापत्र | Thursday, 27/02/2025
बातमी शेअर करा

बीड दि.२६ (प्रतिनिधी)-:मुंबई बाजार समितीचे सभापतीपद अशोक डक यांच्याकडून बीड जिल्ह्याबाहेर गेले. शिंदे(Shinde sena) सेनेचे प्रभू पाटील हे सभापती झाले आणि त्यांच्या स्वागताच्या पोस्ट अशोक डक (Ashok dak)यांचे गाव असलेल्या (Majalgaon)माजलगावमधील कार्यकर्त्यांच्या फेसबुक भिंतीवर झळकल्या.अशोक डक यांच्या एकूणच राजकारणासाठी हा आता आत्मचिंतनाचा विषय झाला आहे.

 

  समाजकेंद्री व्यक्तिमत्व असलेल्या दिवंगत गोविंदराव डक यांचा राजकीय वारसा घेऊन पुढे आलेल्या अशोक डक (Ashok dak)यांचे राजकारण मात्र मागच्या काळात स्वकेंद्री राहिलेले आहे.राजकारणात दीर्घकाळ एकाच पक्षात राहणारे लोक आता अपवाद झालेले आहेत,त्यामुळे अशोक डक यांच्या वेगवेगळ्या पक्षातील प्रवासाबद्दल फारसे काही आक्षेप घेण्यासारखे नाही.मात्र त्यांना राजकारणात स्वतःच्या गावात किती छाप उमटविता आली याचा प्रत्यय नुकताच घडलेल्या घटनेने आला.
अशोक डक यांच्याकडे मुंबई बाजार समितीचे सभापतीपद होते.त्यांना हे सभापतीपद मिळावे यासाठी त्यावेळी (Mla prakash solanke)आ.प्रकाश सोळंके यांच्यापासून अनेकांनी प्रयत्न केले होते.मात्र नंतरच्या काळात अशोक डक यांनी आ.सोळंके यांना विरोध करण्याची भूमिका घेतली होती.आता मुंबई बाजार समितीचे सभापती काही कोणाकडेच दीर्घकाळ राहत नसते,अशोक डक तरी त्याला अपवाद कसे असणार? हे पद नुकतेच (Eknath Shinde)एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला आले आणि प्रभू पाटील हे(Mumbai) मुंबई बाजार समितीचे सभापती झाले.या प्रभू पाटलांचा तसा माजलगावशी फार ऋणानुबंध किंवा स्नेह संबंध म्हणावेत असेही काही नाही.तरीही माजलगावमधील काही राजकीय कार्यकर्त्यांच्या फेसबुक भिंतीवर प्रभू पाटील यांच्या स्वागताच्या पोस्ट झळकल्या.आता हा आनंद प्रभू पाटील यांच्या निवडीचा आहे का अशोक डक यांची मुंबईतील दबदबा संपल्याचा याची चर्चा (Majalgaon)माजलगावमध्ये सुरु आहे. त्याचे उत्तर काहीही असेल पण अशोक डक यांच्यासाठी मात्र हा विषय आत्मचिंतनाचा आहे.

 

 

Advertisement

Advertisement