केज दि.२१ (प्रतिनिधी)- तालुक्यातील (Massajog) मस्साजोग शिवारात आरणगाव रोडवर एक अनोळखी इसम गंभीर दुखापत झालेल्या अवस्थेत (दि.२१) मंगळवार रोजी सकाळी सहाच्या सुमारास आढळला आहे.
सविस्तर माहिती अशी कि,(kaij)केज-बीड रोडवरून उत्तरेश्वर पिंपरी कडे जाणाऱ्या रस्त्यावर सदरील इसम गंभीर दुखापत झाल्याचा अवस्थेत पडलेला आहे. सदरील इसम हा तालुक्यातील बेलगाव येथील असल्याचे सांगितल्या जात असून नाव अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, सदरील इसमाची वैद्यकीय तपासणी झालेली नसली तरी दोन्ही पाय मोठ्या प्रमाणावर क्षतीग्रस्त झाले असून इसम हा मृत झाला असावा असे दिसत आहे.तर अज्ञात वाहनाच्या अपघातात सदरील इसम जखमी झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. (Kaij police)केज पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत अशी माहिती पीआय वैभव पाटील यांनी दिली.
बातमी शेअर करा