बीड दि. २० (प्रतिनिधी ) : बीड जिल्ह्यासह राज्यात अनेक ठिकाणी ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यात अपयश आल्याने गुन्हे दाखल झालेल्या (Jijau Masaheb Bank) 'जिजाऊ माँसाहेब ' मल्टिस्टेटच्या चेअरमन व इतर पदहीकाऱ्यांच्या विरोधात (MPID) Act एमपीआयडीखाली कारवाईला सुरुवात झाली आहे. यासाठी राज्याच्या गृह विभागाने बीडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना प्राधिकृत केले असून आता हे अधिकारी संबंधितांच्या मालमत्ता जप्त करून त्यातून ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी पाऊले उचलणार आहेत.
बीड जिल्ह्यातील (Jijau Masaheb Bank)'जिजाऊ माँसाहेब ; मल्टिस्टेटने ठिकठिकाणी ठेवीदारांच्या ठेवी घेतल्या होत्या. मात्र सदर ठेवी परत करण्यात संस्थेला अपयश आले होते. त्यामुळे मल्टिस्टेटच्या विरोधात बीड जिल्ह्यात तीन ठिकाणी गुन्हे दाखल झाले होते. यातील (baban shinde)बबन शिंदे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. फौजदारी कारवाईसोबतच या प्रकरणात (MPID)Act एमपीआयडीखाली देखील गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या मालमत्ता जप्त करून, त्याचा लिलाव करण्यासाठी एमपीआयडी कायद्याअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने गृह विभागाला पाठविला होता. त्यानुसार आता राज्याच्या गृह विभागाने या प्रस्तावाला मान्यता दिली असून एमपीआयडी कायद्याखाली पुढील कारवाई करण्यासाठी उपविभागीय अधिकारी(Beed) बीड यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.
या मालमत्तांवर येणार टाच
या कड्याखाली (baban shinde)बबन शिंदे आणि त्याच्या नातेवाईकांच्या मालमत्तांवर टाच येणार आहे. यात वासानवाडी ता. (beedI बीड येथील शेत जमीन (१ हे. ७० आर ), निवासी भूखंड,बीड बलगुजार भागातील भूखंड, बीड पिंगळे भागातील भूखंड, तिप्पटवाडी ता. बीड येथील शेतजमीन (९ आर ), तसेच भूखंड, बहिरवाडी येथील भूखंड, आदर्षनगर बीड मधील जिजाऊ माँसाहेब कॉम्प्लेक्सचा दुसरा मजला येथील फ्लॅट ,पालवन येथील शेतजमीन यासह एकूण ३१ मालमत्तांवर टाच येणार आहे. तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची (Jijau Masaheb Bank)बँक खाती आणि दागिने देखील गोठविण्यात येणार आहेत.मनीष शिंदे याच्या मालकीची एमजी हेक्टर गाडी देखील गोठविण्यात येणार आहे.