Advertisement

वाहिरा गावात भीषण हाणामारीत दोन चुलत सख्या भावांची हत्या

प्रजापत्र | Friday, 17/01/2025
बातमी शेअर करा

आष्टी दि.१७(प्रतिनिधी)- (ashti) तालुक्यातील वाहिरा येथे गुरुवारी रात्री दहाच्या दरम्यान जुन्या वादातून तीन सख्खा भावांवर त्याच्याच समाजातील काही लोकांनी लोंखडी राॅड, धारदार शस्त्राने हल्ला केला.या हल्ल्यात दोन चुलत सख्खा भावांचा जागीच मृत्यु झाला. तर अन्य एक (crime news)भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना अंभोरा (beed police)पोलिस ठाणे हद्दीत घडली.अजय विलास भोसले,भरत विलास भोसले असे मयताचे नावे असून कृष्णा विलास भोसले तिघे राहणार हतोळण ता.आष्टी हा गंभीर जखमी आहे.
   

  अधिक माहिती अशी कि,(ashti) आष्टी तालुक्यातील हातोळण येथील अजय विलास भोसले, भरत विलास भोसले, कृष्णा विलास भोसले हे तिघे भाऊ वाहिरा येथे गुरूवार (दि.१६) रोजी आले होते. याच ठिकाणी वाहिरा गावातील व बाहेरील काही लोक जमा झाले होते.गुरूवारी दुपारपासून हे सगळे याच ठिकाणी होते.रात्री साडे नऊ ते दहाच्या दरम्यान यातील काही लोकांनी या तीनही भावांवर लोंखडी राॅड,धारदार शस्त्राने हल्ला चढवला. या हल्ल्यात अजय विलास भोसले, भरत विलास भोसले या दोन सख्खा (beed police)भावांचा जागीच मृत्यू झाला. तर तिसरा भाऊ कृष्णा विलास भोसले हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अहिल्यानगर येथे उपचार सुरू आहेत. या घटनतेली सात संशयित आरोपीना अंभोरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.हा (crime)खून का व कोणत्या कारणावरुन केला हे अद्याप समजले नाही.दोनही मृतदेह (ashti gramin)आष्टी ग्रामीण रूग्णालयात ठेवण्यात आले आहेत.

Advertisement

Advertisement