बीड दि.१२ (प्रतिनिधी)- अंबाजोगाई येथून वाघाळा या गावाकडे जात असलेली (Beed Bus Accident) बस मांडवा घाटात येताच भीषण अपघात झाला. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ही बस कठड्याला धडकली. खाली खोल दरी होती परंतु बस कठड्यावरच अडकल्याने सर्व प्रवासी सुखरूप बसमधून उतरले. या बसमध्ये नऊ प्रवासी प्रवास करत होते. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी दाखल (beed) होत प्रवाशांना मदत केली. चालकाच्या म्हणण्यानुसार बसचे ब्रेक फेल झाले होते. त्यामुळे हा (Bus accident) अपघात झाला. परंतु आता या अपघाताचे नेमके कारण काय? हे बसच्या तपासणीनंतरच समोर येऊ शकेल, असं आगारप्रमुख राऊत यांनी सांगितले आहे.
बातमी शेअर करा