बीड दि.८ (प्रतिनिधी): येथील शहर हद्दीतील एका टपरीवर छापा शहर पोलिसांनी छापा टाकला असता त्याच्यावर गुटखा आढळून आल्यानंतर तो गुटखा त्याने कुठून आणला याविषयी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हा गुटखा मोमीनपुरा भागातून आणल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांच्या टीमने मोमीनुपरा भागात कारवाई केली. या दोन्ही ठिकाणाहून चार ते पाच लाख रूपयांचा गुटख्याचा साठा जप्त केला.
पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या आदेशावरून पोलिसांनी अवैध धंद्यावर कारवाई सुरू केली आहे. बीड शहर पोलीस ठाण्याचे पोनि. शितलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या टीमने बुधवार (दि.८) रोजी सकाळी शहर ठाणे हद्दीतील एका टपरीवर छापा टाकत गुटखा जप्त केला तर त्याला गुटखा पुरवठा करणाऱ्यावरही कारवाई करण्यात आली या कारवाईत तिघांना ताब्यात घेतले असून ही कारवाई एपीआय राठोड, सय्यद अशफाक, मनोज परजणे, बाळासाहेब शिरसाट, सय्यद शहंशाह, शेख फारूख यांनी केली.
बातमी शेअर करा