Advertisement

पन्नास हजाराची लाच घेताना वरिष्ठ लिपिक ताब्यात 

प्रजापत्र | Wednesday, 08/01/2025
बातमी शेअर करा

 बीड दि.८ (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील लाचखोरी कमी होण्याचे नाव घेत नाही.दिवसेंदिवस लाचखोर एसीबीच्या जाळ्यात अडकले जात आहे. बीडच्या शिक्षण विभागातील (माध्यमिक) वरिष्ठ लिपिक संतोष कुडके यास पन्नास हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

सेवानिवृत्त मुख्याध्यापकाचे सेवानिवृत्तीचे लाभ मिळण्यासाठी फाईल पुढे पाठवण्यासाठी ९० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यातील पहिला टप्पा म्हणून ४० हजार रुपये घेतले होते. त्यानंतर दुसरा टप्पा ५० हजार रुपये घेताना ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई बीड एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या टीमने केली. या कारवाईने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.

Advertisement

Advertisement