Advertisement

खून करणाऱ्यांना माझा पाठिंबा नाही -धनंजय मुंडे!

प्रजापत्र | Tuesday, 17/12/2024
बातमी शेअर करा

नागपूर - मसाजोग (beed)येथील सरपंच यांच्या हत्येनंतर मंत्री (dhanjay mundhe) धनंजय मुंडे यांच्यावर हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी घेरले होते यांनतर मंत्री धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेत वाल्मिक कराड हे माझ्या जवळचे आहेत हे मी मान्य करतो पण या प्रकरणाबाबत स्वतः मुख्यमंत्री निवेदन करणार आहेत, तोपर्यंत थांबा.   अशा घाणेरड्या प्रवृत्तीला, खून करणाऱ्या लोकांना आम्ही मदत करतोय, पाठबळ देतोय असं कधी जमलं नाही. आजपर्यंत राजकारणात, समाजकारणात इतक्या वर्षात असं कधी केलेलं नाही” असं धनंजय मुंडे म्हणाले.

 

   मंत्री धनंजय मुंडे पत्रकारांशी संवांद साधताना म्हणाले की, “त्यांच्या सख्ख्या भावाने धनंजय देशमुख यांनी स्वत: स्टेटमेंट केलं आहे. ते स्टेटमेंट केल्यानंतर अशा अतिशय घाणेरड्या घटनेत माझा संबंध लावणं म्हणजे यांना कुठेतरी राजकारण आणायच आहे. मूळात आता हा विषय सभागृहात आणला.  मुख्यमंत्री स्वत: यावर बोलणार आहेत. ही घटना का झाली? कशी झाली? याला काय कारण आहे? कोण जबाबदार आहे? काय चौकशी झाली? किती आरोपींना अटक झाली? याबाबत मुख्यमंत्री स्वत: बोलणार आहेत, तो पर्यंत थांबा” असं धनंजय मुंडे म्हणाले. वाल्मिक कराड यांच्यासोबत फोटो व्हायरल होतोय, त्यावर धनंजय मुंडे म्हणाले की, “बीड जिल्ह्यातून अनेक जण येतात, फोटो काढतात. त्यामुळेच मला आज दीड तास उशिर झाला. त्यांना आमच्यासोबत फोटो काढायचा असतो, आम्हाला तो द्यायचा असतो. ते त्या फोटोच व्यक्तीगत जीवनात काय करतात? याचा संबंध आमच्याशी येत नाही” असं धनंजय मुंडे म्हणाले. “अशा घाणेरड्या प्रवृत्तीला, खून करणाऱ्या लोकांना आम्ही मदत करतोय, पाठबळ देतोय असं कधी जमलं नाही. आजपर्यंत राजकारणात, समाजकारणात इतक्या वर्षात असं कधी केलेलं नाही” असं धनंजय मुंडे म्हणाले.

 

Advertisement

Advertisement