Advertisement

बीडमध्ये आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह

प्रजापत्र | Monday, 16/12/2024
बातमी शेअर करा

 बीड दि.१६ (प्रतिनिधी)- शहरातील बार्शी नाका येथील मोठ्या पुलाजवळ पाण्यात मृतदेह आढळला आहे . सदरील मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम चालू असून पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे.सदरील बेवारस इसम वय यंदाचे ४० हा बिंदुसरा पात्रात मृत अवस्थेत आढळलेला असून सदरील इसमाबाबत काही माहिती असल्यास त्याने पेठ बीड पोलीस हवालदार श्री. शिंदे 8668489386 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

Advertisement

Advertisement