Advertisement

 परभणी दगडफेक प्रकरण; जेलमध्ये असणाऱ्या युवकाचा तुरुंगातच मृत्यु

प्रजापत्र | Sunday, 15/12/2024
बातमी शेअर करा

परभणी : परभणीत दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या तरुणाचा कारागृहात मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत तरुणाचे नाव सोमनाथ सूर्यवंशी (वय ३५) असे असून, त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकारामुळे परभणी शहरात पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची गंभीर दखल घेत नांदेड परिक्षेत्राचे आयजी शाहजी उमाप पुन्हा परभणीत दाखल झाले आहेत. सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यु नेमका कशामुळे झाला याबाबत सध्या काहीही स्पष्ट नाही. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement