बीड दि.१३(प्रतिनिधी)- शिक्षक साजेद अली खून प्रकरणी विक्षिकालीन ठरवलेल्या १४ आरोपीपैकी गुजर खान उर्फ अन्वर खान (beed)मिर्झा खान याच्यासह १२ आरोपींना अजन्म कारावास म्हणजेच जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. उर्वरित दोघांपैकी एकाला पाच वर्षाचा कारावास व पाच लाख रूपये दंडाची तर दुसऱ्याला सहा महिन्याचा कारावास व पाचशे रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेच्या सुनावणीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. विशेष मोक्त (district court)न्यायालयाने प्रथमच एवढया आरोपींना एकाचवेळी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
बीड (beed)शहरातील बालेपीर भागात १९ सप्टेंबर २०१९ रोजी (sainiki school) सैनिकी विद्यालयातील शिक्षक सय्यद साजेद अली (वय ३८) यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात
आली होती. या प्रकरणात एकूण १८ आरोपीविरुध्द आली या प्रकरणात १८आरोपी होता. या प्रकरणात बीडच्या विशेष मोक्का न्यायालयाने १८ पैकी १४ जणांना दोषी ठरवले होते. आज झालेल्या सुनावणीत विशेष मोक्का न्यायालयाच्या न्यायाधीश सुरेखा पाटील यांनी १४ पैकी १२ आरोपींना वेगवेगळ्या (court)कलमांतर्गत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे तर बब्बर खान गुलमोहम्मद खान (वय २८ रा. शहेबाज कॉलनी नेकनूर) यास आरोपी फरार होण्यास मदत केल्याप्रकरणी दोषी ठरवून पाच वर्ष कारावास आणि पाच लाख रूपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास अधिक तीन वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर शेख वसीम शेख बुच्हानोद्दीन (रा. रोशनपुरा बालेपीर बीड) यास सहा महिने कारावास आणि पाचशे रूपये दंडाची शिक्षा तसेच दंड न भरल्यास अधिक एक महिना कारावासाची शिक्षा सुनावली आहे.या प्रकरणात विशेष सरकारी वकील अॅड. अजय तांदळे यांनी काम पाहिले त्यांना जिल्हा सरकारी वकील व सर्व सहाय्यक सरकारी वकील यांचे सहकार्य लाभले. त्याचबरोबर कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलीस अधिक्षक कार्यालयातील पो. उपनि.बी. बी. जायभाये, दोषसिध्द कक्षातील पो.ह.बी.बी. शिंदे, अंमळनेर ठाण्यातील पोह. एस. बी. तरटे, पोह. जी. एम. परझणे, पोलीस अधिक्षक कार्यालयातील आरसीपी पोह. एन. डी. भोसले, शिवाजीनगर ठाण्याचे पोउपनि. एस.पी. वाघमारे यांनी काम पाहिले. तरटे आणि भोसले यांनी विशेष सरकारी वकील यांना सदर प्रकरणात मदत केली.
या १२ जणांना जन्मठेप
अन्यर खान उर्फ गुजर खान मिर्झा खान (रा. गुलशन नगर बालेपीर बीड), मुजीब खान मिर्झा खान पठाण, सय्यद नासेर सय्यद नुर, सय्यद शाहरूख सय्यद नुर, शेख उवेद शेख बाबु, शेख सरफराज उर्फ सरू डॉन, शेख शहेबाज शेख कलीम (रा. रोशनपुरा बीड), शेख अमर शेख अकबर (रा. गुलशन नगर बीड), शेख बबर शेख युसूफ (रा. खासबाग बीड), आवेज काझी (रा. काझी नगर बालेपीर बीड), शेख इम्रान उर्फ काला शेख रशीद (रा. काझी नगर बालेपीर बीड), शेख मझहर उर्फ काल्या उर्फ हाफ मर्डर शेख रहीम (रा. बांगर नाला बीड) या बारा जणांना अजन्म कमावास म्हणजेच जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
मयत साजेद अली