बीड दि.११ (प्रतिनिधी): बीड जिल्ह्यात वाळूची मोठया प्रमाणावर तस्करी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर गेवराईकडून महामार्गावर वाळूची एकही अनाधिकृत गाडी चालणार नाही असे महामार्ग पोलीस शाखेचे सपोनि गणेश मुंडे यांनी म्हटले आहे.
महामार्ग पोलीसांच्या पाडळसिंगी शाखेचा पदभार सपोनि गणेश मुंडे यांनी नुकताच घेतला. महामार्ग नळदुर्ग वरुन ते पाडळसिंगी येथे रुजू झाले. त्यानंतर त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सुचना दिल्या. तसेच या भागातून वाळूची एकही अनाधिकृत गाडी सोडली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्या जिल्ह्यातील वाळु तस्करीचा मुद्दा ऐरणीवर असताना सपोनि गणेश मुंडेंनी घेतलेली भूमिका वाळु माफियांच्या अडचणी वाढविणारी ठरणार आहे.
बातमी शेअर करा