Advertisement

गुटख्याच्या गोडाऊनवर दराडेंचा छापा

प्रजापत्र | Tuesday, 03/12/2024
बातमी शेअर करा

बीड दि.3 (प्रतिनिधी)ः मागील दहा दिवसांपासून पोलीस अधिक्षकांचे पथक कारवायामध्ये थंडावले असल्याचे चित्र निर्माण झाले होते. या बाबत प्रजापत्रने वृत्तही प्रकाशित केले. त्यानंतर मंगळवारी सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळराजे दराडे यांनी अंबाजोगाई शहरातील एका गुटख्याच्या गोडावूनवर छापा मारून लाखोंचा माल ताब्यात घेतला असल्याचे कळते.
बाळराजे दराडे यांनी जिल्ह्यात अवैध धंद्यांवर मोठ्या कारवाया केल्या होत्या. मात्र मागच्या काही महिन्यांपासून त्यांच्या कारवाया थंड पडल्याचे चित्र निर्माण झाले होते. अखेर दराडे यांनी पुन्हा एकदा अवैध धंद्यांवाल्यांकडे आपला मोर्चा वळविला असून अंबाजोगाई शहरातील गणेश प्रोव्हिजन या गोडावूनवर छापा मारून रजनीगंधा, आर.एम.डी, विमल, गोवा, बाबा या नावाचा गुटखा ताब्यात घेतला आहे. या कारवाईत 10 लाख 67 हजारांचा माल पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे कळत असून या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळराजे दराडे, पोलीस उपनिरीक्षक श्री.घाडगे, श्री.मोराळे, श्री.मुंडे, श्री.नागरगोजे, श्री.मस्के, नामदेव सानप यांचा सहभाग होता.

Advertisement

Advertisement