सांगली : महायुतीचे नेते हे एक वचनी रामाचे भक्त आहेत आणि रामानं कधीही वचन मोडलेले नव्हतं. त्यामुळे आता सत्ता आली आहे. तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा सातबारा कोणा करावा; अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. कारण महायुती सरकारने त्याने वचन दिलेले आहे. तसेच सर्वच लाडक्या बहिणीला २१०० रुपये डिसेंबर महिन्यापासून चालू करावे; अशी मागणीही राजू शेट्टी यांनी केली.
सांगली (Sangli) येथे आले असता राजू शेट्टी यांनी माध्यमांशी बोलताना लाडकी बहीण योजनेवरून निवडणुकीच्या पूर्वी सरसकट सर्व बहिणींच्या खात्यावर रक्कम टाकण्यात आली. मात्र नवीन आदेशानुसार निम्मेपेक्षा कमी महिलांना योजनेचा लाभ मिळेल. यामुळे घोषणा केल्याप्रमाणे सरसकट २१०० रुपये बहिणींच्या खात्यावर टाकावेट; असे म्हणत (Mahayuti) महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.
बातमी शेअर करा