मुंबई :महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक 2024 होत असल्यानं विरोधकांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची निवडणूक आयोगाकडं तक्रार केली. त्यामुळे निवडणूक आयोगानं बदलीचे आदेश मुख्य सचिवांना दिल्यानं रश्मी शुक्लांची बदली करण्यात आली. आता मात्र राज्यातील निवडणुका पार पडल्यानंतर सरकारनं पुन्हा पोलीस महासंचालक पदावर रश्मी शुक्ला यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे सरकार स्थापन होण्याअगोदरचं सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना चपराक लगावून आपले इरादे स्पष्ट केले आहेत.
बातमी शेअर करा