राज्यातील विधानसभा निवडणुका संपताच (bjp)भाजपने 'सदस्यता अभियान'ला सुरूवात केली आहे. या अभियानासंदर्भात आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष (Chandrashekhar Bawankule) चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. भाजपचे या अभियानांतर्गत १ कोटी ५१ लाख नवीन सदस्य नोंदणीच लक्ष असून आजपासून नोंदणीला सुरूवात झाली आहे. भाजपला मतदान दिलेल्या सर्व जनतेने सदस्यता अभियानाच्या माध्यमातून (Bharatiya Janata Party) भाजपसोबत जोडावे आणि पक्षाला मजबूत करावे, असे आवाहन बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे.
बातमी शेअर करा