Advertisement

राज्यातील १६३ मतदारसंघात अपक्ष उमेदवारांना पिपाणी चिन्ह दिले

प्रजापत्र | Friday, 15/11/2024
बातमी शेअर करा

बारामती- विधासनभा निवडणुकीत भाजप रडीचा डाव खेळत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी १६३ जागांवर अपक्ष उमेदवारांना पिपाणी चिन्ह दिले आहे. भाजपचा हा रडीचा डाव खेळत असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला. अजित पवारांनी साताऱ्याच्या सभेत याची कबुली दिली आहे. तुतारी आणि ट्रंपेट मुळेच साताऱ्याची शीट आली. यावरून दिसते की भाजप रडीचा डाव खेळत आहे. हे अजित पवारांच्या तोंडून आल्याचे त्या म्हणाल्या.

Advertisement

Advertisement