Advertisement

फटाक्याच्या आवाजाने दीड महिन्याचे बाळ घाबरलं

प्रजापत्र | Tuesday, 05/11/2024
बातमी शेअर करा

छत्रपती संभाजीनगर : चिकलठाण्याच्या हिनानगरात राहणाऱ्या इरफाना आयास शेख (३६) यांच्या घरासमोर राहणारी परवीन शेख यांच्या कुटुंबातील मुले ३ नोव्हेंबर रोजी रात्री ९:३० वाजता फटाके वाजवत होती. त्या आवाजामुळे इरफाना यांचा दीड महिन्याचा नातू घाबरत होता. त्यातून इरफाना व परवीन यांच्यात वाद झाले. याप्रकरणी दोघीही एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्या. तेथे त्यांच्यात तडजोड देखील झाली, परंतु घरी परवीनाच्या कुटुंबाने इरफाना यांच्या घरातील सदस्यांना मारहाण सुरू केली. 

 

 

परवीनाचे भाऊ सलमान पठाण, अर्शद उर्फ आदा पठाण, अझहर पठाण यांनी इरफाना यांचा भाऊ एजाज गणी शेख यांना मारहाण सुरू केली. परवीना, तिची आई मेहरुनिसा, मुलगी जवेरिया शेख यांनी देखील मारहाण सुरू केली. या वादात अर्शदने एजाज यांच्या डोक्यात दगड घातला. रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर पडलेल्या एजाज यांना सहा जण बेदम मारहाण करत होते. त्यातच त्यांच्या डोक्यात पुन्हा लोखंडी रॉडने वार करताच एजाज बेशुद्ध झाले. त्यांना मिनी घाटीत दाखल केले. तोपर्यंत त्यांचा मृत्यु झाला होता. एजाज करमाड तालुक्यात शेती करत होते. निरीक्षक गजानन कल्याणकर, सहायक निरीक्षक भारत पाचोळे यांनी सहा मारेकऱ्यांना अटक केली. उपनिरीक्षक जगन्नाथ मेंदकुदळे अधिक तपास करत आहेत.

 

 

 

Advertisement

Advertisement