Advertisement

 मोहोळमधून रमेश कदम, सिद्धी कदम यांची माघार

प्रजापत्र | Monday, 04/11/2024
बातमी शेअर करा

माजी आमदार रमेश कदम आणि त्यांची कन्या सिद्धी कदम यांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघातून भरलेला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने माझ्या मुलीला लहान वयात संधी दिली, त्या पक्षाचा आदेश पाळला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात आपण अपक्ष फार्म ठेवायचा नाही, हा विचार करून मी आणि माझ्या मुलीने विधानसभा निवडणुकीत माघार घेतली आहे, असे माजी आमदार रमेश कदम यांनी स्पष्ट केले.

Advertisement

Advertisement