Advertisement

विधानसभेच्या तोंडावर प्रकाश आंबेडकरांची तब्येत बिघडली!

प्रजापत्र | Thursday, 31/10/2024
बातमी शेअर करा

पुणे- प्रकाश आंबेडकर यांना छातीत दुखू लागल्याने त्यांना गुरुवारी पहाटे ३१ ऑक्टोबरला पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आंबेडकर यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत अशी माहिती वंचित बहुजन आघाडीच्या सोशल मीडिया अकाउंटवरून देण्यात आली आहे.

 

वंचित बहुजन आघाडीच्या एक्स अकाउंटरून पोस्ट करत प्रकाश आंबेडकर याच्या तब्येतीसंबंधी माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये माहिती देण्यात आली आहे की, बाळासाहेब आंबेडकर यांना छातीत दुखू लागल्याने गुरुवारी पहाटे (३१ ऑक्टोबर) पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.बाळासाहेब आंबेडकर यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, येत्या तासाभरात त्यांची अँजिओग्राफी करण्यात येणार आहे.

आंबेडकर कुटुंबाने विनंती केली आहे की, कुणीही प्रश्न विचारून व्यत्यय आणू नये. कुटुंबाच्या गोपनीयतेच्या विनंतीचा आदर करावा.

पुढील ३ ते ५ दिवस बाळासाहेब डॉक्टरांच्या निरीक्षणात राहणार आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर, निवडणूक समन्वय समिती, जाहीरनामा समिती आणि माध्यम आणि संशोधन विभागाच्या सहकार्याने पुढील काही दिवस वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराचे नेतृत्व करणार आहेत.

 
 

Advertisement

Advertisement