किल्ले धारूर दि.३० (प्रतिनिधी)- खामगाव पंढरपूर महामार्गावर धारूर शहराजवळील घाटामध्ये (दि.३०) रोजी सकाळी सात वाजता कांद्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात झाल्याची घटना घडली. यामध्ये चालकाच्या प्रसंगावधानामुळे कुठलीही जीवित हानी झाली नाही. या घाटात नेहमीच अपघात होत असतात अपघातात अनेकांचे जीव गेले आहेत घाट रुंदीकरणाचा प्रश्न तातडीने सोडवण्याची आवश्यकता आहे.
सविस्तर माहिती अशी कि,सोलापूर वरून कांदे भरलेला एम.एच २६ बी. ई.५०४९ या क्रमांकाचा ट्रक अकोल्याकडे खामगाव पंढरपूर या मार्गे जात असताना धारूर शहराजवळील घाटामध्ये सकाळी सात वाजता पलटी होऊन अपघात झाल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही परंतु यामध्ये सदरील ट्रक व आतील मालाचे लाखो रुपयाचे नुकसान झाले. घाटाची रुंदीकरण करून सामान्य लोकांचे जीव वाचवले जाऊ शकतात. परंतु लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे या घाटात वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत. आज झालेल्या अपघातात चालकाच्या प्रसंग अवधानामुळे कुठलीही जीवित हानी झाली नाही. सदरील घाटाचे रुंदीकरण करावे अशी मागणी तालुक्यातील नागरीक करत आहेत.