Advertisement

 जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या देशमुखांना अखेर बेड्या

प्रजापत्र | Sunday, 27/10/2024
बातमी शेअर करा

अहमदनगर: भाजप नेते सुजय विखे (Sujay Vikhe Patil) यांच्या सभेत वसंतराव देशमुख (Vasantrao Deshmukh) यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या कन्या जयश्री थोरात (Jayshree Thorat) यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुखांना अखेर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. वसंत देशमुख यांना अहमदनगर जिल्ह्याच्या बाहेरून ताब्यात घेण्यात आलं आहे. स्थानिक गुन्हे शाखेने त्यांच्यावर ही कारवाई केली आहे. नगर जिल्हा बाहेरून ताब्यात घेतल्याची माहिती आहे, त्यांच्यावब गुन्हा दाखल झाल्यापासून ते गायब होते. आक्षेपार्ह वक्तव्य केल्यापासून ते फरार होते, त्यानंतर पोलिस त्यांच्या मागावर होते, ते नर जिल्ह्याच्या बाहेर असताना त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांना लवकरच नगरमध्ये आणलं जाईल आणि त्यानंतर त्यांना कोर्टात देखील हजर केलं जाणार आहे. 

Advertisement

Advertisement