Advertisement

आमचा घात केला आता सुट्टी नाही

प्रजापत्र | Sunday, 20/10/2024
बातमी शेअर करा

जालना - आमचा आनंद हिरावून घेणाऱ्यांना सुट्टी नाही. आमच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. पण आम्ही आमच्या लक्षाचा वेध घेणार आहोत. आम्हाला संपवणाऱ्यांना संपवणार म्हणजे संपवणार, असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी केला. ते अंतरवाली सराटी येथे बोलत होते. आमच्यावर सूडबुद्धीने वार केला आणि आमचा घात केला, असा आरोपही यावेळी जरांगे पाटील यांनी केला.

मनोज जरांगे राजकीय हत्यार उपसणार असल्याचं समोर आलय. विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करायचे की पाडायचे याबाबत मनोज जरांगे आज अंतिम निर्णय घेणार आहेत. आज समाजाशी चर्चा करून आपला अंतिम निर्णय ते जाहीर करणार आहेत.

ओबीसींच्या काही जातींना आरक्षण दिलं. पण आमच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. आमचा आनंद हिरावून घेणाऱ्यांना आता सुट्टी नाही. सरकारला आता सुट्टी नाही. आमच्यावर सुडबुद्धीने वार केला, आमचा घात केला. आमच्या आनंदात विष कालवले, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.

 

 

 

Advertisement

Advertisement