मुंबई : भारतातील ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. कट्टर देशभक्त आणि समाजसेवेचा आदर्श जगासमोर उभे करणाऱ्या उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर देश शोकसागरात बुडाला आहे. रतन टाटा यांच्या निधनाचे वृत्त येताच, सोशल मीडियातून त्यांना श्रद्धांजली अर्पित केली जात आहे. भारताचा कोहिनुर, एन्ड ऑफ इरा, प्राईड ऑफ इंडिया, वुई मिस, द ग्रेटेस्ट... या हॅशटॅगसह सोशल मीडिया भावुक झाला आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवरून रतन टाटा यांचे फोटो आणि आठवणी शेअर केल्या जात आहेत. तसेच, रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी पुन्हा सुरू झाली आहे. रतन टाटा (Ratan Tata) यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी केली जात असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही रतन टाटांना भारतरत्न देण्याची विनंती केंद्राला करणारा प्रस्ताव संमत केल्याची माहिती दिली. आता, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून रतन टाटा यांना भारतरत्न (Bharatratna) देण्याची मागणी केली आहे.
बातमी शेअर करा