Advertisement

  रतन टाटांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळणार?

प्रजापत्र | Thursday, 10/10/2024
बातमी शेअर करा

मुंबई- प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांच्या निधनानंतर राज्यात आज (गुरुवारी) एक दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे. रतन टाटा यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आणि श्रद्धांजली म्हणून हा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर आज ज्येष्ठ उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांना आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा शोकप्रस्ताव बैठकीत मांडला. यावेळी रतन टाटा यांचे कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्तावही संमत करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement