नुकत्याच झालेल्या हरियानाच्या विधानसभा निवडणुकीत ऑलिम्पिकपटू विनेश फोगाटने जुलाना या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. आज या निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये विनेश फोगाटने बाजी मारत भाजपच्या योगेश कुमार यांचा पराभव केला.
विनेशेचा हा विजय फक्त तिच्यासाठीच खास नाही तर काँग्रेससाठीही खास आहे. कारण गेली २५ वर्षे आणि ५ निवडणुकांमध्ये काँग्रेसला येथून विजय मिळवता आलेला नव्हता.या निवडणुकीत विनोश फोगाट विरोधात भाजपच्या योगेश कुमार यांच्यासह १३ उमेदवार होते. यामध्ये विनेशने पाच हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला.
निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळानुसार जुलाना मतदारसंघाची १५ पैकी १५ फेऱ्यांची मतमोजणी झाल्यानंतर काँग्रेसच्या विनेश फोगाटला ६४ ४९१ इतकी मते मिळाली. तिच्या मतांची टक्केवारी ४६.७७ इतकी होती.दुसरीकडे विनेशचे प्रमुख प्रतिस्पर्धी भाजपचे योगेश कुमार यांना 58728 इतकी मते मिळाली तर त्यांच्या मतांची टक्केवारी ४२.५९ इतकी होती.दरम्यान हरियानात स्वबळावर निवडणूक लढवणाऱ्या आम आदमी पक्षाने विनेश विरोधात दिलेल्या उमेदवाराला केवळ १२६६ मते मिळाली.