चाकण: प्रसिद्ध कीर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर यांना महाळुंगे एमआयडीसी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. बेकायदा जमाव जमवून जेसीबी - पोकलॅन्ड मशीनच्या सहाय्याने कंपनीच्या रस्त्यावर खड्डे पाडून आणि गॅस पाईपलाइन तोडून लोकांच्या जीवितास धोका निर्माण त्यांच्यासह अनोळखी दहा ते पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांनी दिली. अजित रामदास पाटील (वय.३४ वर्षे,रा.चिंचवड,पुणे ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चैतन्य सयाजी वाडेकर,अमोल सयाजी वाडेकर (दोघे रा.भांबोली, ता.खेड ) यांच्यासह दहा ते पंधरा अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहितीनुसार, चैतन्य महाराज वाडेकर हे प्रसिद्ध कीर्तनकार आहेत. ते खेड तालुक्यातील भांबोली या गावांमध्ये राहतात त्यांच्या घराशेजारून कोरल लॉजीस्टिक असेस्ट इंडिया या कंपनीचा रस्ता जातो. या रस्त्यावरून त्यांचा कंपनीशी वाद आहे. यावरून चैतन्य महाराज वाडेकर याने आपल्या भावासह इतर दहा ते पंधरा जणांच्या मदतीने (दि.२) रात्री कंपनीत जाणारा रस्ता जेसीबी आणि पोकलँड मशीनच्या सहाय्याने खोदला. तसेच कंपनीची सुरक्षा भिंत ही पाडण्यात आली. वीज पुरवठा करणाऱ्या हाय हॉलटेज वायरी तोडल्या आहेत. निष्काळजीपणे खोदाई करतना एम.एन.जी. एल.गॅस पाईपलाइन तोडल्याने त्यातून गॅस गळती होऊन परिसरातील लोकांच्या जीवितास धोका निर्माण केला. पुढील तपास म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलीस अधिक तपास करीत आहेत. चैतन्य महाराज वाडेकर हे नेहमीच प्रसिद्ध कीर्तनकार असून ते नेहमीच सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात. ते रिल्स देखील बनवतात. त्यांचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत.