पुणे: पुण्यातील बावधन बुद्रुक परिसरात बुधवारी सकाळी एक हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यु झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, सकाळी पावणेसात वाजता हा अपघात झाल्याचे समजते. अपघातावेळी हेलिकॉप्टरमध्ये दोन वैमानिक आणि एक इंजिनीअर होता. हेलिकॉप्टरणने उड्डाण केल्यानंतर ते मुंबईतील जुहूच्या दिशेने निघाले होते. मात्र, उड्डाण केल्यानंतर काहीवेळातच हेलिकॉप्टर दरीत कोसळले. हा अपघात नेमका कसा घडला, याची नेमकी माहिती समोर आलेली नाही. हा परिसर पुणे-बंगळुरु महामार्गापासून काही अंतरावर आहे
बातमी शेअर करा