सणासुदीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी ९.५ कोटी शेतकऱ्यांना मोठी भेट देणार आहेत. ५ ऑक्टोबर २०२४ रोजी, पंतप्रधान मोदी वाशिम येथे एक बटण दाबून प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा १८ वा हप्ता ९.५ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करतील. मोदी सरकार सलग तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर १८ जून २०२४ रोजी १७ वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आला.
येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि ५ ऑक्टोबर २०२४ रोजी पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत ९.५ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २००० रुपये जमा होतील.
बातमी शेअर करा