Advertisement

मुंबईला दहशतवादी हल्ल्याचा धोका!

प्रजापत्र | Saturday, 28/09/2024
बातमी शेअर करा

मुंबई- भारताची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये सुरक्षा (Mumbai On Alert) वाढवण्यात आली आहे. गुप्तचर यंत्रणांनी सणासुदीच्या दिवसात दहशतवादी हल्‍ल्‍याची शक्‍यता वर्तवली आहे. या संभाव्य धोक्‍याच्या पार्श्वभूमीवर शहराच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. महत्‍वाची ठिकाणे, शासकीय कार्यालये, पर्यटनस्‍थळे अशा ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या ठिकाणी कडक तपासणी करण्यात येत आहे.

 

विमानतळ, रेल्‍वे स्‍टेशन, मॉल्‍स आणि सार्वजनिक ठिकाणांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. सुरक्षा रक्षकांनी या ठिकाणांवरील तपासणी सुरू केली आहे. सुरक्षेला यंत्रणेला अधिक सक्षम बनवण्यासाठी ॲडव्हान्स टेक्‍नॉलॉजीचा वापर करण्यात येत आहे.मुंबई पोलिसांनी सांगितले आहे की, आम्‍हाला गर्दीची ठिकाणे तसेच धार्मिक स्‍थळांवर मॉक ड्रिल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व पोलिस अधिकाऱ्यांना आपल्‍या परिसरातील सुरक्षा व्यवस्‍थेवर विशेष लक्ष देण्याच्या सूचना करण्यात आल्‍या आहेत.

क्राईम ब्रँच, एटीसी, स्‍थानिक पोलिस या सर्वांच्या एकत्रिकरणातून सुरक्षा व्यवस्‍थेवर कडक केली आहे. संवेदनशील क्षेत्रात उपाययोजना राबवण्यात येत आहेत. संदिग्‍ध हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे. तसेच अनेक सुरक्षा एजन्सींकडून मुंबई शहराच्या सुरक्षेवर लक्ष ठेवले जात आहे.

Advertisement

Advertisement