बीड दि.२७ (प्रतिनिधी)-एका हॉटेल चालकावर दाखल असलेल्या गुन्ह्यात प्रतिबंधकात्मक कारवाई टाळून प्रकरण बंद करण्यासाठी तलाठी व उपविभागीय अधिकाऱ्यांसाठी ७ हजारांची लाच घेताना तलाठ्याला रंगेहात पकडण्यात आले.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत आणखी एका महसूलमधील अधिकाऱ्याला पकडण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
बीड जिल्ह्यातील लाचखोरांचे प्रमाण लक्षणीय झाले आहे.विशेष म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची सूत्रे हाती घेतल्यापासून शंकर शिंदे यांनी जिल्ह्यातील अनेक बड्या अधिकाऱ्यांवर कारवाया केल्या होत्या.त्यातच आता शुक्रवारी (दि.२७) दारूच्या एका गुन्ह्यात मदत करण्यासाठी व प्रकरण बंद करण्यासाठी तलाठ्याने स्वतःसाठी २ हजार तर उपविभागीय अधिकाऱ्यांसाठी ५ हजार असे ७ हजारांच्या लाचेची मागणी केली होती.त्यानुसार सदर लाच स्वीकारताना निलेश धर्मदास मेश्राम (वय-३१ तलाठी- सजा (मांजरसुंबा) ला रंगेहात पकडले आहे.या कारवाईत पोलीस हवालदार साईनाथ तोडकर,राजेंद्र नंदिले,सी.एन.बागुल यांचा समावेश होता.

बातमी शेअर करा