Advertisement

परळीतील इलेक्ट्रिक गोदामाला भीषण आग;लाखोंचे साहित्य जळून खाक

प्रजापत्र | Monday, 18/01/2021
बातमी शेअर करा

किरण धोंड 
परळी-शहरातील पद्मावती भागातील गटशिक्षण कार्यालयासमोरील एका इलेक्ट्रिक गोदामाला भीषण आग लागून लाखोंचे साहित्य जळून खाक झाल्याची घटना सोमवारी (दि.१८) पहाटे ३.३० च्या सुमारास घडली आहे. 
            पद्मावती गल्ली येथील रामेश्वर गोपीकिशन बोरा यांच्या खालच्या मजल्यात इलेक्ट्रिक वस्तूंचे गोदाम आहे.यात इलेक्ट्रिकच्या विविध वस्तू,साहित्य,स्विच,कॉपर वायर,ट्रान्सफार्म,इलेक्ट्रिक किट,पंखे आदी लाखोंचे साहित्य जळून खाक झाले आहे.सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसून या आगीत १२ लाखांचे नुकसान झाले आहे.अग्निशामक दलाने ही आग आटोक्यात आणली असून आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही.

Advertisement

Advertisement