मुंबई- गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांमध्ये (Rain) पावसाने विश्रांती घेतली आहे. यातच पुणे, मुंबई, मराठवाडा, विदर्भ, सोलापुरसह अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस नसल्याने नागरिकांना उकाड्याला सामोरे जावे लागत आहे. मात्र (Maharashtra) महाराष्ट्रात २३ ते २८ तारखे दरम्यान मुसळधार पाऊस (Rain) होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे नागरिक सुखातील असे म्हटले जात आहे.
अधिक माहितीनुसार, अंदमान बेटाच्या उत्तर भागात वादळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे येत्या काळात (Maharashtra) महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्रात निर्माण होऊ घातल्याने हा पाऊस पडू शकतो. विदर्भ, मराठवाडा, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. अंदमान बेटाच्या उत्तर भागात शनिवारी हवेची चक्रीय स्थिती निर्माण होऊन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचा अंदाज आहे.यामुळे विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात २३ ते २८ सप्टेंबर दरम्यान जोरदार पावसाची शक्यता आहे.(Heavy rain is likely between September 23 and 28)
कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यात पुढील आठवडाभर जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली.(Maharashtra Rain Weather Update )