मुंबई- जो राहुल गांधीची जीभ छाटेल , त्याला ११ लाखांचे बक्षीस देणार, असं वादग्रस्त वक्तव्य शिंदे गटाचे आमदार गायकवाड यांनी केलं आहे. काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्यावर असताना आरक्षणासंदर्भात भाष्य केलं होतं. याच्या संदर्भात बोलताना संजय गायकवाड यांची जीभ घसरली आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलं आहे. असे असताना काँग्रेसचा खरा चेहरा आणि त्यांची मळमळ राहुल गांधी यांनी बोलून दाखवली. लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी खोटा नेरेटिव्ह सेट केला. त्यातूनच समाजाची मतं घेतली. पण, आता काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे. काँग्रेसला एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण काढायचं आहे, असं संजय गायकवाड म्हणाले आहेत.
बातमी शेअर करा