कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय-एम) सरचिटणीस सीताराम येचुरी यांचे निधन झाले आहे. सीताराम येचुरी यांनी वयाच्या ७२ व्या वर्षी दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. येचुरी यांना फुफ्फुसात संसर्ग झाल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक दिवस डॉक्टरांचे पथक त्याच्यावर उपचार करत होते, मात्र त्यांना वाचवता आले नाही.
येचुरी यांच्यावर दीर्घकाळ उपचार सुरू होते. त्यांना फुफ्फुसात संसर्ग झाला होता. येचुरी यांना १९ ऑगस्ट रोजी दिल्ली एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. न्यूमोनिया आणि छातीत संसर्ग झाल्याच्या तक्रारीनंतर त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले. ७२ वर्षीय येचुरी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना नंतर आयसीयूमध्ये हलवण्यात आले. मात्र गुरुवारी त्यांची मृत्यूशी सुरु असलेली झुंज संपली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला.