Advertisement

 'लाडकी बहीण' जोमात, आता 'या' महिलांना थेट मिळणार ४५००

प्रजापत्र | Wednesday, 11/09/2024
बातमी शेअर करा

महाराष्ट्र सरकारने 'लाडकी बहीण योजने'ची अंतिम मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे, अशी घोषणा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी गेल्या आठवड्यात केली होती.दरम्यान आता ज्या महिलांना आतापर्यंत अर्ज करता आले नव्हते त्या महिलांना आता अर्ज केल्यानंतर आधीचे दोन महिने आणि आताच्या महिन्याचा असे तीन हप्ते मिळणार आहेत. यामध्ये जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचा समावेश आहे.

 

 

या योजनेंतर्गत गरीब महिलांना प्रत्येक महिन्याला १,५०० रुपयांचे रोख प्रोत्साहन दिले जाणार आहेत.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सुरू केलेल्या या योजनेचे उद्दिष्ट २१ ते ६५ वर्षे वयोगटातील विवाहित, घटस्फोटित आणि निराधार महिलांना सहाय्य करणे आहे.३१ ऑगस्ट रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली होती की, या योजनेचा विस्तार करून २.५ कोटी महिलांचा समावेश केला जाईल. राज्य सरकारने आतापर्यंत १.७ कोटी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात निधी वर्ग केला आहे.

 

 

'लाडकी बहीण योजने'साठी कोण पात्र?
ही योजना जूनच्या अखेरीस राज्याच्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली होती. या योजनेसाठी वार्षिक ४६,००० कोटी रुपये खर्चाचा अंदाज आहे. ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशाच महिला या योजनेसाठी पात्र आहेत.

या योजनेद्वारे राज्यातील लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याल १५०० रुपये तर मिळणारच आहेत, पण याबरोबर तीन एलपीजी गॅस मोफत मिळणार आहेत.

Advertisement

Advertisement